kendrapramuk bharti pariksha 2023
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग
यांचे अध्यक्षतेखाली
दिनांक २६-०५-२०२३ रोजी राज्यमंडळ
पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या
महत्वाच्या सुचना
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग
यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २६/०५/२०२३ रोजी
राज्य मंडळ, पुणे येथे बैठक
घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी मा. प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, आयुक्त (शिक्षण), आयुक्त क्रिडा, प्रकल्प संचालक,
म.रा.प्रा. परिषद, शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक),
शिक्षण संचालक
(प्राथमिक), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक
(योजना)चे संबंधित अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना
देण्यात आल्या.
सदर बैठकीत दिलेल्या सूचना pdf स्वरूपात पाहण्यासाठी क्लिक करा
बैठकीमध्ये दिलेल्या महत्वाच्या सुचना.
एकात्मिक स्वरुपात पुस्तकामध्ये वह्यांची पाने समाविष्ट करणे.
एकात्मिक स्वरुपात पुस्तकामध्ये
वह्यांची पाने समाविष्ट
करण्यात आलेली आहेत. या पानांच्या
सुयोग्य व प्रभावी
वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना
तातडीने निर्गमित
कराव्यात, यादृष्टीने
कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात
आल्या.
संबंधित अधिकारी संचालक, बालभारती पुणे
शासन निर्णय दि.०६/०२/२०२३ नुसार अनुदानास पात्र ठरणाऱ्या
शाळांना वेतन अदा करण्यासाठी तातडीने
शासनाकडून शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम
मुदत देण्यात आलेली होती. सदर मुदतीनंतर क्षेत्रीय
स्तरावर प्राप्त झालेले परंतु मूळ मंत्रीमंडळ ठरावात
समाविष्ठ असलेल्या प्रस्तावावर
कार्यवाही करावी,
संबंधित अधिकारी शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्यमिक) व शिक्षण संचालक (प्राथमिक)
आधार पडताळणी बाबत
आधार पडताळणीसाठी अंतिम मुदत १५ जून २०२३ राहील.
त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता अंतिम
करण्याबाबत सूचित करण्यात आले. ३०.११.२०२२ दिनांक
गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता
करताना संस्थेने काही तफावत निदर्शणास आणून दिल्यास
एक स्तर वरिष्ठ अधिका-याने शहनिशा
करून निर्णय घ्यावा
व अशी सर्व प्रकरणे त्याचवेळी आयुक्त
शिक्षण यांचे
निदर्शनास आणून द्यावीत.
संबंधित अधिकारी शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्यमिक) व शिक्षण संचालक (प्राथमिक)
नवीन शिक्षक भरती बाबत
१९६ संस्थांच्या भरतीबाबतचे कामकाज तलिसमा संस्थेकडून करण्यात येत आहे या संस्थेकडून पुढील दोन महिन्यासाठी काम करून घेण्यात यावे व निविदा प्रक्रिया तातडीने राबवून एजन्सी निश्चित करावी.
संबंधित अधिकारी शिक्षण आयुक्तालाय
स्वयंअर्थसहाय्यित शाळा प्रस्ताव
प्राप्त सर्व प्रस्ताव अंतिम
करण्याबाबतचे नियोजन करण्यात
यावे. नवीन शाळा परवानगीसाठी बृहत
आराखडा तयार
करण्यात यावा व सदर बृहत
आराखड्यानुसार मान्य
असलेल्या ठिकाणी नवीन शाळा परवानगी
बाबत विचार
करावा. तो पर्यंत नवीन प्रस्ताव
स्वीकारू नयेत.
संबंधित अधिकारी शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्यमिक)
स्काऊट गाईड
प्रत्येक शाळेत स्काऊट गाईड अनिवार्य
करण्याबाबत
आयुक्त, क्रीडा यांनी प्रस्ताव सादर करावा.
संबंधित अधिकारी आयुक्त, क्रीडा
क्रीडा शिक्षक नियुक्त करणे
किमान पाच शाळांमध्ये एक क्रीडा शिक्षक नियुक्त करणे
बाबत चर्चा करण्यात आली यामध्ये माजी
सैनिकांचा ब्रिज
कोर्स करून विचार करावा. यासाठी
क्रीडा विभाग व शालेय
शिक्षण विभाग यामध्ये सामंजस्य करार
करावा.
संबंधित अधिकारी आयुक्त, क्रीडा
राज्यामध्ये समूह शाळा योजना राबविणेबाबत
राज्यामध्ये समूह शाळा योजना राबवण्या
बाबत चर्चा
करण्यात आली. सदर योजना यशस्वीपणे
राबवण्यासाठी
योजनेचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी
समिती नेमण्यात
यावी व समितीने योजनेचा सविस्तरपणे
अभ्यास करून
अहवाल सादर करावा.
संबंधित अधिकारी शिक्षण आयुक्तालाय
व्यावसायिक शिक्षण
१) इयत्ता सहावी ते आठवी या वर्गामध्ये
कृषी विषयाबाबत
अभ्यासक्रम तयार असून याबाबतचा कृषी
विभागाबरोबर
करावयाच्या सामंजस्य कराराबाबत
प्रकल्प संचालक, एम
पी एस पी यांनी सादरीकरण करावे.
संबंधित अधिकारी प्रकल्प संचालक एम पी एसपी
२) कृषी विषय हा कार्यानुभव विषयाचा
एक भाग करणेबाबत
चर्चा करण्यात आली तसेच सदरचा विषय
श्रेणी ऐवजी
अनिवार्य गुणांचा करणेबाबतही चर्चा
करण्यात आली.
याबाबत संचालक, एस सी ई आर टी
यांनी सविस्तर प्रस्ताव
तयार करावा.
संबंधित अधिकारी संचालक, एस सी ई आर टी पुणे
खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिपाई पदावर अनुकंपा भरती
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च
माध्यमिक यांनी त्यांच्या
दिनांक १५.९.२०२२ च्या पत्रानुसार सर्व क्षेत्रीय
अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या
आहेत त्यानुसार
केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण
संचालक माध्यमिक
व उच्च माध्यमिक यांनी तात्काळ सादर
करावा.
संबंधित अधिकारी शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्यमिक)
केंद्रप्रमुख भरती
परीक्षा परिषदेमार्फत याबाबत कारवाई
सुरू असून
आयबीपीएस या कंपनी मार्फत याबाबतचे
परीक्षा घेण्यात
येणार असून सदरची परीक्षा १७ जून रोजी
घेण्याचे
प्रस्तावित असले बाबत सांगण्यात आले.
१७ जून रोजी
परीक्षा घेऊन सदर परीक्षेचा निकाल २५
जून च्या दरम्यान
जाहीर करण्याबाबत तसेच ३० जून पर्यंत
केंद्रप्रमुखांचे
निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती
देणे बाबत कार्यवाही
करावी.
संबंधित अधिकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
केंद्रप्रमुख पद सर्व भरती शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा
सहसंचालक पदावरील नियुक्ती
प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेल्या
सहसंचालक पदाबाबत
मॅटमध्ये दाखल असलेल्या केस बाबत श्री
गोसावी यांनी
संघटनेची चर्चा करून मार्ग
काढण्याबाबत सूचित करण्यात
आले.
संबंधित अधिकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
शिक्षक भरतीचे वेळी उमेदवाराने नियुक्तीसाठी जिल्हा / विभागाचा पर्याय निवडल्यानंतर
नियुक्तीनंतर त्यामध्ये बदल करता येणार नसल्याबाबत
ग्रामविकास विभागाकडे सद्यस्थितीत शिक्षक बदली
बाबतची किती प्रकरणे प्रलंबित आहे
याबाबतची माहिती
घेऊन बदली बाबतची सर्व प्रकरणे अंतिम
करणे व नवीन
नियुक्त शिक्षकांना नियुक्ती देणे
याबाबत ग्राम विकास
विभागासोबत पुढील आठवड्याच्या
सुरुवातीस बैठक
आयोजित करावी.
संबंधित अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय
शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहार कक्षातील उपसंचालक
महाराष्ट्र वित्त
व लेखा हे पद भरणे बाबत वित्त
विभागाशी चर्चा
करण्याबाबत सूचित करण्यात आले.
संबंधित अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय